सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन !
सांगली, ५ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याप्रकरणी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी ४ जानेवारी या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘जाहीर निषेध आंदोलन’ करण्यात आले. या वेळी अनेक धारकरी, श्रीरामभक्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हणमंतराव पवार म्हणाले की, सातत्याने भगवान श्रीरामाच्या संदर्भात गरळओक करणारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.