France : शेतकरी सरकारी कार्यालयांच्या दारावर टाकत आहेत शेतीमाल !
कृषी कायद्यात पालट केल्याचा निषेध !
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत. ते तेथील शेतकर्यांना मान्य नाहीत. यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.
France: Farmers are dumping agricultural waste at the doors of Government offices.
Farmers rage against the changes in agriculture policies.
DETAILS: #Paris (#France) – French farmers believe the changes in new pesticide and land use policies, would crucially affect them… pic.twitter.com/5wGGF4yRnZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 5, 2024
या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात फ्रान्सचे शेतकरी त्यांचा शेतीमाल सरकारी कार्यालयांच्या दारावर नेऊन टाकत असल्याने तेथे ढिगारे बनले आहे. तसेच काही जण खत, शेण आणि गवत हेही आणून टाकत आहेत. रस्त्यावर हे साहित्य आणून टाकले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.