भारत आत्मविश्‍वासाने आणि वेगाने पुढे जात आहे ! – चीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारत आत्मविश्‍वासाने पुढे जात आहे. जगासाठी हा एक महत्त्वाचा देश बनला आहे. जागतिक व्यापार, संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकारण यांसह अनेक गोष्टींमध्ये देश वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणात सकारात्मक पालट झाले आहेत, असे कौतुक चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने केले आहे. फुडान विद्यापिठाच्या ‘सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीज’चे संचालक झांग जियाडोंग यांचा लेख ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला आहे. यात यांनी वरील कौतुक केले आहे.

या लेखात जियाडोंग यांनी पुढे लिहिले आहे की, अलीकडेच मी माझ्या दुसर्‍या भेटीसाठी भारतात पोचलो. ४ वर्षांपूर्वी माझी पहिली भारत भेट झाली होती. मी पाहिले की, भारताचे देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरण ४ वर्षांत पूर्णपणे पालटले आहे. भारताने आर्थिक विकास आणि सामाजिक प्रशासन यांमध्ये पुष्कळ चांगली प्रगती केली आहे. भारताची रणनीती स्वप्नांच्या पलीकडे वास्तवाकडे वळली आहे.

संपादकीय भूमिका

  • चीनने भारताचे कौतुक केल्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. चीनने भारताचा नेहमीच विश्‍वासघात केल्याने त्याच्या गोड बोलण्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही !