‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’ यांच्याकडून स्मशानभूमीस ७ सहस्र शेणी दान !

शेणी दान देतांना ‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्या

कोल्हापूर – महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँप, कसबा बावडा, तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्या वतीने विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी शेणी आणि लाकूड भविष्यात अल्प पडू नये; म्हणून शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन ‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’च्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी ७ सहस्र शेणी दान देण्यात आल्या.

या वेळी आरोग्य निरीक्षक महेश भोसले, ‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’च्या अध्यक्षा मनीषा संकपाळ, सचिव सुस्मिता मांडे, समिता चौगुले, सुवर्णा वाडीकर, समिता घोसाळकर उपस्थित होत्या.

महापालिकेच्या आवाहनानुसार शेणी दान देणार्‍या ‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’ यांचे अभिनंदन ! इतरांनीही ‘इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर’चा आदर्श घेऊन त्याप्रमाणे कृती करावी !