Dilbagh Singh ED Raid : हरियाणातील राजदचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड
५ कोटी रुपयांची रोकड, ४ विदेशी रायफल्स अन् ३०० काडतुसे जप्त
चंडीगड – हरियाणातील भारतीय राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि अन्य काही जण यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’ने) घातलेल्या धाडीतून ५ कोटी रुपये रोख रक्कम, विदेशी दारूच्या १०० बाटल्या, ४ विदेशी रायफल्स अन् त्याची ३०० काडतुसे, तसेच सोन्याची ३ बिस्किटे जप्त केली. याखेरीज विदेशातील संपत्तीची कागदपत्रेही जप्त करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरून खाण व्यावसायिकांच्या एकूण २० ठिकाणी या धाडी घातलण्यात आल्या. खाण व्यवसायातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी या धाडी घालण्यात आल्या.