Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती !
जगात १२ वा क्रमांक !
मुंबई – उद्योगपती गौतम अदानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, तर जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या सूचीमध्ये ते १२ व्या स्थानावर पोचले आहेत. श्रीमंतांच्या सूचीत त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९७.६ अब्ज डॉलर इतकी आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स’ या प्रसारमाध्यमाकडून ही सूची प्रसारित करण्यात आली आहे.
यापूर्वी मुकेश अंबानी १२ व्या स्थानावर होते, तर गौतम अदानी १४ व्या स्थानावर होते. मागील २४ घंट्यांमध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये ७.६ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. यामुळे मुकेश अंबानी यांची १२ व्या स्थानावरून १३ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.