Khalistani Attack Hindu Temple : अमेरिकेत पुन्हा एकदा खलिस्तान्यांनी केले हिंदु मंदिरावर आक्रमण !
मंदिरांच्या भिंतीवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा आणि पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अपशब्द !
कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील हेवर्ड भागातील विजय शेरावली मंदिराच्या भिंतींवर खलिस्तान्यांनी भारतविरोधी घोषणा लिहिल्या. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द लिहून ‘खलिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने या घोषणांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
#Breaking: Another Bay Area Hindu temple attacked with pro-#Khalistan graffiti.
The Vijay’s Sherawali Temple in Hayward, CA sustained a copycat defacement just two weeks after the Swaminarayan Mandir attack and one week after a theft at the Shiv Durga temple in the same area.… pic.twitter.com/wPFMNcPKJJ
— Hindu American Foundation (@HinduAmerican) January 5, 2024
१. अमेरिकेत सातत्याने हिंदूंच्या मंदिरांवर अशा प्रकारे होणार्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर या परिसरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी होत आहे. यामुळे आरोपींना ओळखता येऊ शकणार आहे.
२. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील नेवार्क येथील स्वामीनारायण मंदिरावर अशाच प्रकारचे आक्रमण झाले होते, तर दुर्गा मंदिरात चोरीची घटना घडली होती. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनीही नेवार्क येथील मंदिरावरील आक्रमणाविषयी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, मी ही बातमी पाहिली आहे. आम्हाला याची चिंता आहे. भारताबाहेरील अतिरेकी आणि फुटीरतावादी शक्तींना जागा मिळू नये. आम्ही अमेरिकी अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी आशा आहे.
Another #HinduTemple attacked by #Khalistani goons in the #UnitedStates !
The temple wall was vandalized with anti-India graffiti and slurs about #PMModi.
👉 What else is expected in #America, if it gives away clean chit to anti-Indian Khalistani terrorist Gurpatwant Singh… pic.twitter.com/Je8MQddAAP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 5, 2024
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आंतकवादी आणि भारतविरोधी गुरपतवंत सिंह पन्नु याच्यावर कारवाई न करणार्या अमेरिकेत याहून वेगळे काय घडणार ? अशा घटनांविषयी भारताने अमेरिकेला सज्जड भाषेत जाणीव करून देणे आवश्यक आहे ! |