२२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी घोषित करावी ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री
मुंबई – २२ जानेवारी या दिवशी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित करावी, ही सकल हिंदु समाजाची मागणी आहे. त्यामुळे हा दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित करावी, अशी मागणी राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ४ जानेवारी या दिवशी पत्राद्वारे केली आहे. या दिवशी राज्यात सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याची सूचना द्यावी, तसेच सार्वजनिक दीपोत्सवालाही अनुमती द्यावी, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.