आश्रमातील सात्त्विक लादीवर पाय घसरून पडूनही इजा न होणे आणि ‘प.पू. गुरुदेवांनीच अलगद झेलले आहे’, असे वाटणे

सौ. मधुरा सहस्रबुद्धे

‘१६.८.२०२२ या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता मी धान्य निवडण्याची सेवा पूर्ण करून धान्य विभागातून भोजनकक्षाच्या दिशेने जात होते. अचानक माझा पाय लादीवरून घसरून मी खाली पडले; पण मी पडल्यानंतर मला ‘मी कापसावरच पडले आहे’, असे जाणवले. एवढ्या जोरात पडूनही मला कुठेही फारसे लागले नाही. तेव्हा ‘आश्रमातील सात्त्विक भूमी ही कापसाची लादीच आहे आणि मी पडत असतांना प.पू. गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) मला अलगद झेलले’, असे मला जाणवले. यातून लक्षात येते की, आपल्या सर्व साधकांवर प.पू. गुरुदेवांचे एखाद्या माऊलीप्रमाणे सतत लक्ष असते. यासाठी प.पू. गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा सहस्रबुद्धे (वय ४९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा. (१०.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक