गुरुदेवा, व्हावे मी तव चरणीचा एक धूलीकण ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
युगांमागूनी युगे चालली गुरुदेवा, करावी तव प्रीतीची आराधना ।
सदा अनुसंधानात रहावे तुमच्या, श्वासागणिक तव प्राप्तीची याचना ।। १ ।।
साधनेतील आरंभीचा उत्साह, न ती तळमळ उरे अंतरी ।
तरी गुरुदेवा, हात देता पदोपदी, तव कृपे साधनेचा दीप तेवे हृदयमंदिरी ।। २ ।।
अंतरीची ही ज्योत, ठेवे मज भावबंधनात ।
त्यायोगे आहे साधनारत, तव कृपेची प्रतीक्षा अविरत ।। ३ ।।
दोष-अहंचे ओझे डोईवर, घेऊनी मी मिरवता ।
प्रक्रिया (टीप १) तुम्ही राबवून घेता, दावी ती साधनेच्या प्रकाशवाटा ।। ४ ।।
दोष-अहं दडले खोल अंतरात, ठेचे त्यास तुमचे समष्टी रूप ।
संघर्ष लोटे मज माघारी, भाववृद्धीने मिळे साधनेस हुरूप ।। ५ ।।
नकारात्मकता शिवता मनास, दिशा देई सूचनासत्र (टीप २) ।
करण्या साधनाकेंद्रित विचार अन् कृती, सांगती ठेव अंतर्मुख वृत्ती ।। ६ ।।
दिधले व्यष्टी ध्येय मोक्षप्राप्तीचे, समष्टी ध्येय ते हिंदु राष्ट्र-निर्मितीचे ।
होईल तव संकल्पाने साकार, त्यायोगे व्हावा आमचा उद्धार ।। ७ ।।
सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आपण, घ्यावे तव चरणी सामावून ।
अनंत, अनादि आपण, व्हावे मी तव चरणीचा एक धूलीकण ।। ८ ।।
टीप १ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया
टीप २ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत योग्य विचार अन् कृती करण्यासाठी मनाला सूचना देणे.’
– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा.
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |