इस्लामिक स्टेट पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर आक्रमण करण्याचा करत आहे प्रयत्न !
पाकच्या गृहमंत्रालयाने दिली माहिती !
इस्लामाबाद – इस्लामिक स्टेट पाकिस्तानमध्ये त्याचे अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून तो धार्मिक अल्पसंख्यांक, तसेच शिया मुसलमान यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती पाकच्या गृहमंत्रालयाने तेथील राज्यसभेत दिली. ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीज’च्या अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांतील ८२ टक्के मृत्यूंसाठी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, इस्लामिक स्टेट आणि बलुच लिबरेशन आर्मी उत्तरदायी आहेत.
अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अफगाणिस्तानातील ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेच्या पाकमधील कारवाया वाढल्या. यासाठी ती अन्य संघटनांचे साहाय्यही घेत आहे. खैबर पख्तूनख्वा, तसेच बलुचिस्तान या प्रांतांत त्यांच्या आतंकवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|