Baluchi Agitation : पाक पोलिसांनी बलुची लोकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये !
इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून पाक पोलिसांची कानउघाडणी
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक यंत्रणांकडून बलुची लोकांवर होत असलेल्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी त्यांनी देशव्यापी आंदोलन चालू केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेला मोर्चा राजधानी इस्लामाबादमध्ये पोचला. २० डिसेंबरपासून येथील ‘नॅशनल प्रेस क्लब’च्या बाहेर धरणे आंदोलन केले जात आहे. पाक पोलीस हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
Islamabad High Court reprimands #Pakistan Police.
The High Court orders Police to not uproot the #Balochi protest that's going on for the last 15 days in the capital#MarchAgainstBalochGenocide pic.twitter.com/FmuBHIpPDL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2024
या विरोधात बलुची आंदोलकांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. या वेळी न्यायालयाने पाक पोलिसांना निर्देश दिले की, त्यांनी आंदोलकांच्या विरोधात बळाचा वापर करू नये, तसेच त्यांचे आंदोलन दडपू नये. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारी या दिवशी होणार आहे.