Bomb Threat : श्रीराममंदिर आणि योगी आदित्यनाथ यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे दोघे अटकेत !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विशेष कृती दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे. ते मूळचे गोंडा येथील रहिवासी आहेत. भारतीय किसान मंच आणि भारतीय गौ सेवा परिषद यांचे अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांनीच हा कट रचल्याचे समोर आले आहे. सुरक्षा मिळवण्यासाठी आणि मोठा नेता बनण्यासाठी त्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना धमकीचा ई-मेल पाठवण्यास सांगितले होते.
सौजन्य मायनेशन
देवेंद्र तिवारी यांच्या सांगण्यावरून तहर सिंग आणि ओम प्रकाश यांनी २ नवीन भ्रमणभाष संच खरेदी केले होते. त्यानंतर दोघांनी देवेंद्र यांच्या कार्यालयातील इंटरनेटचा वापर करून त्यांच्या एक्स खात्यावरून धमकी दिली होती.