मुंबईच्या सौ. श्रद्धा देशमुख यांना ‘सेवा करतांना चुका झाल्या, तरी त्या चुकांतून शिकून पुढे जायचे’, असे प्रथमोपचार शिबिराच्या आयोजनाच्या सेवेतून शिकता येणे 

‘एकदा मला प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्याची  सेवा मिळाली होती. या वेळी माझ्याकडून शिबिराच्या आयोजनाच्या सेवेत झालेल्या काही चुका उत्तरदायी कार्यकर्त्यांनी सांगून त्यावरचे योग्य दृष्टीकोन दिले होते. त्यानंतर मला माझ्या चुका स्वीकारता आल्या. या प्रसंगात माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

सौ. श्रद्धा देशमुख

१. ‘स्वतःकडून झालेली चूक सांगतांना रडू येणे’, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘यातून शिकून पुढे जायचे आहे’, असा विचार देणे

आरंभी माझ्याकडून झालेली चूक सांगतांना मला रडू आले. माझ्या मनात आले, ‘मला रडू का आले ?’, तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला या शिबिराच्या माध्यमातून इथपर्यंत आणले आहे; पण माझे प्रयत्न न्यून पडले; म्हणून रडू आले.’ या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी त्या दिवशी प्रसाद-महाप्रसाद घेण्यासाठी जातांना जिन्याची प्रत्येक पायरी चढतांना आणि उतरतांना त्यावर मानसरित्या ‘शरणागतभाव’, असे लिहीत गेले. नामजप करण्यासाठी खोलीत बसल्यावर श्री गुरुदेवांना शरण गेले. तेव्हा त्यांनी माझ्या मनात विचार दिला, ‘तुला येथून शिकून पुढे जाण्यासाठी शिबिर आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मानसरित्या अडचण सांगितल्यावर लगेच ‘अडचण सुटत असणे’, त्यामुळे अडचणींच्या विचारात मन न अडकणे

गुरुदेव, तुमच्याच कृपेमुळे आता माझे मन स्थिर झाले आहे. प्रथमोपचार शिबिर घेण्याच्या उपक्रमातून आपणच माझी साधना करून घेणार आहात. आपल्याला मानसरित्या अडचण सांगितल्यावर ती लगेचच सुटते. त्यामुळे अडचणींच्या विचारांत मन अडकत नाही. ‘अडचणींपेक्षा देव मोठा आहे’, असा विचार माझ्या मनात येतो.

३. कृतज्ञता

‘आता सेवा करतांना ‘गुरुदेवांना अपेक्षित असे करायचे आहे. त्यांना अपेक्षित असे होऊ दे. गुरुदेवच सर्व करून घेणार आहेत’, असे विचार माझ्या मनात असतात. त्यामुळे आता मला कशाचाही ताण येत नाही. त्यासाठी  मला गुरुदेवांच्या चरणी आणि सहसाधकांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– सौ. श्रद्धा देशमुख, मुंबई (१५.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक