सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती
‘२१ ते २५.६.२०२१ या कालावधीत ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकत असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. माझे मन एकाग्र होऊन एका क्षणात निर्विचार झाले.
२. नंतर ‘एक पोकळी निर्माण झाली. मी त्या पोकळीत आत आत जात आहे’, असे मला वाटत होते.
३. मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. ‘मी हवेत तरंगत पुढे पुढे जात आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते.’
– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.