हे गुरुराया, कृतज्ञ मी तुझ्या चरणी ।
‘श्री सनातन’ माझे आई ।
सांग होऊ कशी मी उतराई ।
नाम, सत्संग दिलेस तू ।
संत सहवास,
भावसत्संगही दिलेस तू ।। १ ।।
माझे माहेरचे कुलदैवत
श्री मल्लिकार्जुन ।
बालपणी मी त्या
शिवलिंगाचे घेई दर्शन ।
मनास सतावी एकच प्रश्न, हा तर आहे ‘काळा पाषाण’ ।
कळेल कसे त्याला माझे संभाषण ।। २ ।।
अनुभूती देऊनी गे माये ।
शंका-कुशंका तू केल्यास दूर ।
अन् आत्मविश्वासही वाढवलास ।
देवत्वाची प्रचीती देऊन ।। ३ ।।
श्रद्धाही तू दृढ केलीस ।
‘गुरुकृपेच्या छत्राखाली आहोत’ ।
हा विचारही तूच दिलास ।
थोर तुझे उपकार आई ।। ४ ।।
सांग कशी होऊ मी उतराई ।
हे कृपाळू ईश्वरा न ढळो ही श्रद्धा ।
हेची मागणे आता ।
हे गुरुराया, अनंत कोटी कृतज्ञ मी तुझ्या चरणी ।। ५ ।।
टीप – गुरुराया, आई, माऊली, ईश्वरा, माये हे शब्द सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी वापरले आहेत.
– सौ. तेजा म्हार्दाेळकर, म्हार्दाेळ, गोवा.