सुनील केदार यांचा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज !
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरण
नागपूर – काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जामिनासाठी नवा अर्ज केला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २२ डिसेंबर या दिवशी त्यांचा जामीन अर्ज नाकारून त्यांच्या ५ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार केदार यांची आमदारकी रहित झाली होती. ‘बँक घोटाळ्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून शेतकर्यांच्या पैशाशी निगडित आहे’, असे सांगत न्यायालयाने सुनील केदार यांना जामीन देण्यास आणि शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.