पुणे येथे सराफाच्या दुकानात ३ कोटींचा दरोडा !
५ किलो सोन्यासह १० लाखांची रोकड घेऊन चोर पसार !
पुणे – येथे चोर बनावट चावीचा वापर करून रविवार पेठेतील एका सराफाच्या दुकानात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घुसला. त्यानंतर ५ किलो ३२३ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह १० लाख ९३ सहस्र रुपयांची रोकड असा एकूण ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दुकानाच्या ‘सीसीटीव्ही’त चोर चोरी करत असल्याचे चित्रित झाले आहे. आरोपीचा शोध चालू आहे. या प्रकरणी दुकानाचे मालक यांनी आरोपीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. चोरीच्या घटनेवरून चोरी करणार्यात दुकानात सध्या काम करणार्या किंवा पूर्वी काम करत असलेल्या माजी कर्मचार्याचा समावेश असल्याचा संशय आहे.