वसईतील अयप्पा मंदिर सभागृहात ६ ते ८ जानेवारी या कालावधीत हिंदु महासंमेलन !
वसई (जिल्हा पालघर) – सनातन धर्म सभा वसई यांच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही वसई (पश्चिम) येथील अयप्पा मंदिराच्या सभागृहात ६ ते ८ जानेवारी असे ३ दिवस हिंदु महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. गत तीन मासांपासून याची सिद्धता चालू आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहेत. ८ जानेवारी या दिवशी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमात उपस्थित रहाणार असून या वेळी हिंदु जागरण मंचच्या प्रांत कार्यकर्त्या प्रीती राऊत या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत. संमेलनास देशभरातून अनेक संत वसईत येणार आहेत, असे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सनातन धर्म सभा वसईचे अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टचे संयोजक उत्तम कुमार यांनी सांगितले. भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांसह अनेक संत यात उपस्थित रहाणार आहेत.