प्रथमोपचार शिबिराच्या कालावधीत सौ. ज्योती दाभोळकर यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
१. शारीरिक त्रास होत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजल्यावर त्रास दूर होणे
एकदा सकाळी मला मळमळत होते आणि माझे डोके दुखत होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजल्यावर मला आनंद झाला आणि माझा कृतज्ञताभाव वाढला. मला होत असलेले शारीरिक त्रास दूर झाले. मी शरणागतभावात, शांत आणि स्थिर होते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात अन्य शिबिरार्थी बोलत असतांना ‘आपणही बोलूया’, असे मला वाटले; पण ‘काय बोलू ?’, असे वाटून मनाचा संघर्ष झाला.
आ. मी सत्संगात शिबिरातील अनुभव सांगितले. मी सत्संगात शिबिरात शिकतांना मिळालेल्या आनंदाविषयी सांगितले.
इ. माझे बोलणे संपल्यावर माझ्या सहस्रारातून प्रचंड कळा येत होत्या. कानातून पुष्कळ वाफा निघाल्या.
ई. मी गुरुमाऊलींच्या चरणी ‘कृपा करा’, अशी सतत प्रार्थना केली. तेव्हा माझा त्रास न्यून झाला. मला शारीरिक त्रास झाला, तरीही माझे मन अत्यंत आनंदी आणि कृतज्ञताभावात होते.
उ. ‘एकादशीच्या दिवशी मला साक्षात् श्रीविष्णूचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन झाले’, असे मला वाटले.
हे गुरुमाऊली, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. ज्योती दाभोळकर, बेळगाव
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |