प्रथमोपचार शिबिरातील मार्गदर्शनामुळे सौ. लक्ष्मी गायकवाड यांना व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी दिशा मिळणे !

‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे मला प्रथमोपचार शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. लक्ष्मी गायकवाड

१. प्रथमोपचार सेवा करतांना ‘भाव कसा ठेवायचा आणि सेवेकडे साधना म्हणून कसे पहायला हवे ?’, हे माझ्या लक्षात आले.

२. ‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) प्रथमोपचार सेवेतून माझी साधना आणि प्रगती करून घेणार आहे’, हे ध्येय निश्चित झाल्यामुळे माझ्या मनाची अंतर्मुखता वाढली आहे.

३. शिबिरात केलेल्या सूत्रसंचालन सेवेमुळे देवानेच माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. मला वाटले, ‘येथून घरी गेल्यावर भगवंतच माझ्याकडून प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग घेणार आहे आणि तोच मला बळ देणार आहे.’’

४. ‘मोकळेपणाने न बोलण्याने किती गंभीर परिणाम होऊ शकतात. आपल्यातील एका स्वभावदोषामुळे अनेक परिणाम होतात, तर आपल्यातील अनेक स्वभावदोषांमुळे शारीरिक आणि मानसिक स्तरावर किती परिणाम होत असतील ?’, हे माझ्या लक्षात आले.  स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवण्याचे महत्त्व मला समजले.

५. ‘व्यष्टी आणि समष्टी सेवेचे नियोजन कसे करावे ?’, हे मला शिकायला मिळाले. त्यामुळे माझ्या मनाला सुस्पष्टता येऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्यासाठी मला दिशा मिळाली.’

– सौ. लक्ष्मी गायकवाड, पुणे (१५.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक