‘गुरुतत्त्व जिवांचा उद्धार करते’, याची प्रचीती घेतलेल्या नागेशी, गोवा येथील सौ. सविता तिवारी !
‘वर्ष १९७७ मध्ये आमचा विवाह झाला. आमच्या विवाहाच्या वेळी माझ्या वडिलांचे (कै. मन्नाप्रसाद दुबे यांचे) गुरु प.पू. नागानिर्वाण महाराज उपस्थित होते. त्यानंतर काही वर्षांनी आमच्या जीवनात परात्पर गुरु डॉ. आठवले आले. गुरुतत्त्वाने आमचा उद्धार केला. त्याविषयी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. विवाहापूर्वी साधिका आणि तिचे यजमान साधना करत असणे अन् साधिकेच्या विवाहाच्या वेळी तिच्या वडिलांचे गुरु उपस्थित असणे
माझे यजमान (पू. सत्यनारायण तिवारी) विवाहापूर्वी एका हठयोगी संतांच्या मार्गदर्शनाखाली घंटो न् घंटे ध्यानसाधना करत असत. प.पू. नागानिर्वाण महाराज माझ्या वडिलांचे गुरु होते. मी ‘भगवद्गीतचे वाचन आणि मनन करणे’ अशी साधना करत असे. आम्ही १० भावंडे आहोत; मात्र केवळ माझ्या विवाहप्रसंगी प.पू. नागानिर्वाण महाराज उपस्थित होते. त्या वेळी आम्ही (मी आणि माझे यजमान) त्यांना ओवाळले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !
विवाहानंतर माझे जीवन पुष्कळ खडतर होते. आम्हा कुटुंबियांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. काही वर्षांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गुरु म्हणून लाभले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा सर्व कुटुंबियांचा वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात, वेळप्रसंगी जीवनदान देऊन सांभाळ केला आहे.
३. गुरुतत्त्वाने प.पू. नागानिर्वाण महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून केलेले साहाय्य !
‘गुरु’ हे तत्त्व आहे. गुरुतत्त्वाने प.पू. नागानिर्वाण महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला आमचे खडतर प्रारब्ध भोगण्यासाठी बळ दिले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधी प्रत्यक्ष, तर कधी तत्त्वरूपाने साहाय्य करून आम्हाला साधनेतील आनंद दिला. ‘माझे यजमान संतपदी विराजमान होणे’, हे केवळ गुरुकृपेनेच शक्य झाले आहे’, असे मला वाटते.
(माझे यजमान २३.४.२०२३ या दिवशी संत झाल्याचे घोषित करण्यात आले.)
‘गुरुतत्त्व जिवांचा उद्धार करते’, याची जाणीव मला आणि कुटुंबियांना झाली अन् आमची श्रद्धा वृद्धींगत झाली.’
या कृपेसाठी आम्ही गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– सौ. सविता तिवारी (वय ७२ वर्षे), नागेशी, गोवा. (३.५.२०२३)
|