विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात भाविकांचे बेमुदत धरणे आंदोलन !
गहाळ झालेल्या दागिन्यांची चौकशी करावी, तसेच निकृष्ट लाडू बनवणार्या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारात अनागोंदी असल्यामुळे ही समिती विसर्जित करावी, या मागणीसाठी पंढरपूर येथे १ जानेवारी या दिवशी बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. गहाळ झालेल्या दागिन्यांची चौकशी करावी, निकृष्ट लाडू बनवणार्या संस्थेवर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली आहे, तसेच मंदिरातील अन्य अपप्रकारांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे. सामाजिक संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चाही काढण्यात आला आहे.
सौजन्य शिवसंदेश न्यूज
संपादकीय भूमिकाआंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक ! |