Ram Lalla Idol : कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती मंदिरात स्थापित होणार ! – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून १७ जानेवारीला अधिकृत घोषणा होणार
म्हैसुरू/अयोध्या – अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी रामललाची मूर्ती अंतिम करण्यात आली आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती बनवली केली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ‘एक्स’वरून ही घोषणा केली. असे असले, तरी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून याविषयीची अधिकृत घोषणा १७ जानेवारीला करण्यात येणार आहे.
१. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी ‘एक्स’द्वारे म्हणाले, ‘‘जिथे राम आहे, तिथे हनुमान आहेच ! कर्नाटक ही हनुमानाची भूमी आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकची रामललासाठी ही महत्त्वाची सेवा आहे, यात शंका नाही.’’
"ಎಲ್ಲಿ ರಾಮನೋ ಅಲ್ಲಿ ಹನುಮನು"
ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮನ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ವಿಗ್ರಹ ಆಯ್ಕೆ ಅಂತಿಮಗೊಂಡಿದೆ. ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಹೆಸರಾಂತ ಶಿಲ್ಪಿ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಶ್ರೀ @yogiraj_arun ಅವರು ಕೆತ್ತಿರುವ ಶ್ರೀರಾಮನ ವಿಗ್ರಹ ಪುಣ್ಯಭೂಮಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ. ರಾಮ ಹನುಮರ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ಇದು… pic.twitter.com/VQdxAbQw3Q
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) January 1, 2024
२. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले की, योगीराज यांचे अभिनंदन ! राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
ರಾಮಾಯಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಿಷ್ಕಿಂಧೆಯ ಆಂಜನೇಯ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರನ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದ್ದನ್ನು ನೆನಪಿಸುವಂತೆ ಈಗ ಮತ್ತೊಂದು ಸುಯೋಗ ಒದಗಿಬಂದಿದೆ. ಮೈಸೂರಿನ ಶಿಲ್ಪಿ ಶ್ರೀ ಅರುಣ್ ಯೋಗಿರಾಜ್ ಅವರು ಕೆತ್ತಿರುವ ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮನ ವಿಗ್ರಹ ಅಯೋಧ್ಯೆಯ ಭವ್ಯ ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೆ…
— B.S.Yediyurappa (@BSYBJP) January 1, 2024
३. मूर्तीकार अरुण योगीराज म्हणाले की, मला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. ज्या शिल्पकारांची या कामासाठी निवड झाली आहे, त्यामध्ये मी आहे, याचा मला आनंद आहे. मूर्ती अशी असावी की, ज्यामध्ये परमेश्वराचे दिव्य बालस्वरूप दिसू शकेल. जेव्हा लोक मूर्तीकडे पहातात, तेव्हा त्यांना देवत्व जाणवते. बालस्वरूप चेहरा आणि भगवंताचे देवत्व डोळ्यांसमोर ठेवून काही महिन्यांपूर्वी मी कामाला आरंभ केला. अरुण योगीराज यांनी देहलीतील इंडिया गेटवर स्थापित नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही सिद्ध केला आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांचे वक्तव्य !
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांनी २ जानेवारी या दिवशी म्हटले की, कुठली मूर्ती अंतिम करण्यात आली आहे ?, ते मला सांगता येणार नाही, मंदिर समिती ती अंतिम करणार आहे. १७ जानेवारीला याविषयीची अंतिम माहिती रामभक्तांना देण्यात येईल.
अशी आहे रामललाची मूर्ती !
अयोध्येतील श्रीराममंदिराच्या गर्भगृहासाठी रामललाच्या एकूण ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. तिघांचीही उंची प्रत्येकी ५१ इंच इतकी आहे. तिन्ही मूर्तींमध्ये कमळाच्या आसनावर बसलेल्या रामललाचे ५ वर्षांचे बालस्वरूप चित्रित करण्यात आले आहे. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची अनुमाने ८ फूट आहे.