लहान मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावरील गोळ्यांचे औषध आता द्रव स्वरूपातही उपलब्ध !
मुंबई – रक्ताचा कर्करोग असलेल्या मुलांना त्यांच्या वजनानुसार या गोळीची मात्रा देण्यात यायची; मात्र कमी मात्रेच्या गोळ्या देतांना काही वेळा अडचण येते. गोळ्यांच्या ऐवजी आता द्रव स्वरूपातील औषध विकसित करण्यात आले आहे. टाटा मेमोरिअल रुग्णालय, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, आय.डी.आर्.एस्. लॅब (बंगळूर) यांच्या सहकार्याने हे ‘मर्केपटोप्युरिनि’ हे औषध सिद्ध करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर या दिवशी चेन्नई येथील परिषदेमध्ये या औषधाची घोषणा करण्यात आली असून आतापासून टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये हे औषध उपलब्ध झाले आहे.