संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खांचा सहवास नकोसा वाटणे

वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरै: सह ।
न मूर्खजनसंपर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि ॥

– नीतीशतक, श्लोक १४

अर्थ : पर्वतांसारख्या दुर्गमस्थानी वनचरांसह भ्रमण करणे बरे; पण मूर्खांचा सहवास, देवाधिदेव इंद्राच्या महालात घडला तरी तो बरा नव्हे. – नीतीशतक, श्लोक १४


मूर्खाला वठणीवर आणण्यासाठी कोणतेही साधन नसणे

शक्यो वारयितुं जलेन हुतभुक्छत्रेण सूर्यातप्तो
नागेन्द्रो निशिताङ्कुशेन समदो दण्डेन गोगर्दभौ ।
व्याधिर्भेषजसङ्ग्रहैश्च विविधैर्मन्त्रप्रयोगैर्विषं
सर्वस्यौषधमस्ति शास्त्रविहितं मूर्खस्य नास्त्यौषधम् ॥

– नीतीशतक, श्लोक ११

अर्थ : आग पाण्याने विझवणे शक्य आहे. सूर्याचे ऊन छत्रीने निवारता येते. मदोन्मत हत्ती तीक्ष्ण अंकुशाने आणि गायी, गाढवे काठीने वठणीवर आणता येतात. औषधांचा संग करून रोग आणि विविध मंत्र प्रयोगाने विष निवारता येईल. शास्त्रात सर्वांना औषध सांगितले आहे; पण मूर्खाला औषध नाही. – नीतीशतक, श्लोक ११


मूर्खाला शास्त्र सांगण्याचा काय उपयोग ?

किं मिष्टमन्नं खरसूकराणाम् किं रत्नहारः मृगपक्षिणां च ।
अंधस्य दीपः बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथा प्रसंगः ॥

अर्थ : गाढव आणि डुक्कर यांना मिष्टान्न देऊन काय उपयोग ? पशु पक्ष्यांना रत्नहार देऊन काय उपयोग ? आंधळ्याला दिवा, बहिर्‍याला गीत आणि मूर्खाला शास्त्र सांगण्याचा काय उपयोग ?