नागपूर म्हणजे गुन्हेगारांची राजधानी ! – खासदार सुप्रिया सुळे
पुणे – देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ‘नागपूर शहर म्हणजे सध्या गुन्हेगारांची राजधानी झाली आहे’, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकार्यांना शेतकर्यांच्या प्रश्नांवर आयोजित केलेल्या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.