क्रांतीवीर चापेकर वाड्यावर आणखी ७ कोटी रुपयांचा खर्च !
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड गाव येथे क्रांतीवीर चापेकर वाडा बनवण्यात येत आहे. दृकश्राव्य, प्रोजेक्शन मॅपिंग आणि विविध डिजिटलायझेशनसाठी आणखी ७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चापेकर वाड्याचे काम होत असून हा खर्च महापालिका करत आहे. महापालिकेच्या विद्युत् विभागाने ६ कोटी ७७ लाख १५ सहस्र २७० रुपयांची निविदा काढली होती. यातील ४ निविदांपैकी मुव्हींग पिक्सल या ठेकेदाराने दिलेला दर स्वीकारून त्याला काम दिले आहे. कामाची मुदत ६ मास असून या खर्चाला आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची संमती दिली आहे.