हवेली (पुणे) तालुक्यातील मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी केली शासनाची फसवणूक !
पुणे – हवेली तालुक्यातील तत्कालीन थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे आणि लोणी काळभोरच्या तलाठी पद्मिनी मोरे यांनी संगनमताने शासनाचा अनुमाने २ लाख २५ सहस्र रुपयांचा महसूल बुडवला आहे. त्याविषयीची तक्रार पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे प्रविष्ट करण्यात आली आहे.
हवेली तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार सुनील कोळी यांनी ‘२७ नोव्हेंबर २०१८ ला तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याची प्रावधाने लागू होणार्या फेरफार नोंदी करू नयेत’, याविषयी सर्व तलाठी अन् मंडल अधिकार्यांना परिपत्रक बजावले होते; परंतु मंडल अधिकारी कवडे आणि तलाठी मोरे यांनी या परिपत्रकाला न जुमानता फेरफारमध्ये तुकडा विक्रीची नोंद केली होती. (वरिष्ठांनी जारी केलेल्या परिपत्रकाला न जुमानणारे मंडल अधिकारी आणि तलाठी यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)