सुरक्षेचा उपाय म्हणून येरवडा (पुणे) कारागृहातील २० बंदीवानांचे स्थलांतर !
पुणे – येरवडा कारागृहामध्ये नुकतीच पूर्ववैमनस्यातून एकाची कात्रीने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने हत्या केलेल्या बंदीवानावर आणि त्यांच्या सहकार्यांवर प्रतिआक्रमण होण्याची शक्यता असल्याने कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशाने २० बंदीवानांना अन्य जिल्ह्यांतील कारागृहामध्ये स्थलांतरित केले आहे. बंदीवानांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे.
कारागृहात शिक्षा भोगणार्या बंदीवानांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे ३० कर्मचार्यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक बराकीची आणि संशयित बंदीवानांची सुरक्षारक्षकांकडून नियमित कसून पडताळणी मोहीम चालू केली आहे, तसेच कारागृहाच्या आतील आणि बाहेरील तटभिंतीच्या सुरक्षेसाठी २२ होमगार्ड तैनात केले आहेत. बंदीवानांचे नातेवाईक आणि बंदीवान मुलाखतीला येणार्या ठिकाणी सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाबंदीवानांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यावर धर्माचे संस्कार केल्यास अशी वेळ येणार नाही. प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होणे आवश्यक आहे ! |