आंदोलन करणार्या ट्रकचालकांकडून पोलिसांना मारहाण, दगडफेक !
|
नवी मुंबई – नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते जेएन्पीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रकचालकांचे आंदोलन चालू होते. दुपारी १२ नंतर रस्ता अडवण्यात आला. याला विरोध करणार्या पोलिसांवर ट्रकचालकांनी आक्रमण केले. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करत मागे हटवले, तसेच दगडफेक आणि काठ्या यांनी त्यांना मारहाण केली. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. या प्रकरणी ५० हून अधिक ट्रकचालकांना कह्यात घेण्यात आले आहे.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात साहाय्य न केल्यास १० लाखांचा दंड आणि ७ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात ट्रकचालकांनी आंदोलन केले होते.
संपादकीय भूमिकाट्रकचालकांकडून पोलिसांना मारहाण होणे म्हणजे पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण ! |