हे गुरुमाऊली (टीप), लीन होऊदे तुझिया चरणी ।
परमपूज्य (टीप) हे विश्वगुरु ।
परमपूज्य हे जगद्गुरु ।
परमपूज्य हे नामगुरु ।
परमपूज्य हे वेदगुरु ।। १ ।।
जगत्जननी तू जगत्पालका ।
अनंतकोटी ब्रह्मांडनायका ।
विश्वाधारा मोक्षदायका ।
सत्याचरणी सत्यपालका ।। २ ।।
तू ही राम अन् तू ही कृष्ण ।
तू ही ब्रह्म अन् तू ही शिव ।
विश्वशांती ही आस आमची ।
विश्वक्रांती ही तृषा आमची ।। ३ ।।
आम्ही पामरे तुझी लेकरे ।
जशी फुलांवर फुलपाखरे ।
इकडून तिकडे तिकडून इकडे ।
मन चंचल हे असे बागडे ।। ४ ।।
हे गुरुमाऊली, लीन होऊदे तुझिया चरणी ।
स्थिर होऊदे तुझिया चरणी ।
कलियुगी या अवतरलासी ।
सन्मार्ग दाखवण्या सकल जनांसी ।। ५ ।।
बदलसी तू या जगतासी ।
हेची मागणे तव चरणांसी ।
विश्वशांती हा ध्यास आमचा ।
विश्वशांती ही आस आमची ।। ६ ।।
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– सौ. तेजा म्हार्दाेळकर, म्हार्दाेळ, गोवा
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |