पू. भाऊकाका (पू. सदाशिव (भाऊ) परब) आले देवदला । परम पूज्यांचा आशीर्वाद मिळाला आम्हाला ।
‘मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्तजयंती) (२६.१२.२०२३) या दिवशी सनातनचे २६ वे (समष्टी) संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा ८३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सौ. प्रज्ञा जोशी यांनी त्यांच्या नावाच्या आद्याक्षरापासून बनवलेले काव्य येथे दिले आहे.
पू. : पू. भाऊकाका आले देवदला ।
परम पूज्यांचा आशीर्वाद मिळाला आम्हाला ।। १ ।।
भा : उभा विठ्ठल भक्तांसाठी २८ युगे विटेवरी ।
गुरुकृपेचा वर्षाव झाला आम्हावरी ।। २ ।।
ऊ : ऊसापरी मधुर असे त्यांची वाणी ।
कृतज्ञ सर्व साधक गुरुदेवांच्या चरणी ।। ३ ।।
का : कांचनापरी दैवी गुण आहेत त्यांच्यात ।
प्रार्थना करतो, ते गुण यावेत आमच्यात ।। ४ ।।
का : काकांचे वय आहे आता त्र्याऐंशी ।
तरुणांना लाजवेल अशी प्रकृती आहे त्यांची ।। ५ ।।
योगासने आणि व्यायाम आहे याचे रहस्य ।
चला आपण सर्व होऊया या वर्गाचे सदस्य ।। ६ ।।
– सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१२.२०२३)