Hindu Muslim controversy : (म्हणे) ‘संघ आणि भाजप यांनी हिंदु-मुसलमान वाद अंतिम टप्प्यावर आणला आहे !’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची विद्वेषी मुक्ताफळे !

प्रकाश आंबेडकर

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी हिंदु-मुसलमान यांच्यातील वाद आणि तिरस्कार अंतिम टप्प्यावर आणला आहे. त्यामुळे तिरस्कार हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. (जातीयवादी राजकारण करणारे वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष द्वेषभावना पसरवण्याचे राजकारण सतत करत असतात, हे कुणी वेगळे कशाला सांगायला हवे ? – संपादक) ओबीसी आणि मराठा यांच्यात आता आरक्षणाच्या नावाने भांडणे लावली आहेत. द्वेष आणि मत्सर या दोन्ही समाजांमध्ये पसरतांना, वाढतांना दिसत आहे. हा मत्सर वाढणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे फुकाचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, राममंदिरामुळे देशातील वातावरण धार्मिक झाले आहे. असे असले, तरी ते आणखी धार्मिक होईल, असे वाटत नाही. याचा एक लाभ म्हणजे ‘सत्ता आणि धर्म या २ वेगळ्या गोष्टी आहेत’, हे दिसायला लागले आहे. लोकांना हे कळू लागले आहे की, देवळातली मूर्तीपूजा ही व्यक्तीगत स्वरूपाची आहे, भावनेशी संबंधित आहे. तर संसदेतील सत्ता ही लोकांशी संबंधित आहे. (राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश ही या राष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी त्याला कुणीही विचारणार नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

लव्ह जिहाद, हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करणे, दंगली घडवणे अशी कृत्ये करून धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे या वादाचे खापर संघ किंवा भाजप यांच्यावर फोडणे, हा हिंदुद्वेष होय !