Love Jihad : दानिश याने हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सतत २ महिने केला बलात्कार !

‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक घटना उघड !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील दानिश नावाच्या मुसलमान तरुणाने १४ वर्षीय हिंदु मुलीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने मुलीचे अपहरण करून तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर २ महिने सतत बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला गोमांस खाण्यास आणि नमाजपठण करण्यास भाग पाडले. पोलिसांनी दानिशला कह्यात घेतले आहे.

१. दानिश स्वत:ला श्रीमंत असल्याचे दाखवत होता; मात्र प्रत्यक्षात तो एका झोपडीत रहात होता. पीडित मुलगी त्याच्या जाळ्यात अडकल्यावर त्याने तिला २२ ऑक्टोबर २०२३ या दिवशी भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी आल्यावर त्याने तिला त्याच्या झोपडीत ओलीस ठेवले आणि तिच्यावर २ महिने सतत बलात्कार केला. पीडित मुलीने अनेकवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला.

२. दानिश ३० डिसेंबर २०२३ या दिवशी पीडित मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी बलपूर्वक लग्न करणार होता; मात्र त्याच कालावधीत हिंदु संघटनांना त्याच्याविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी दानिशच्या तावडीतून मुलीची सुटका केली. मुलीच्या वडिलांनी दानिशच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.