Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ ‘रिक्टर स्केल’चा भूकंप : सुनामीची चेतावणी

टोकियो – जपानला १ जानेवारी या दिवशी ७.६ ‘रिक्टर स्केल’ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. पश्‍चिम जपानमधील इशिकावा आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे निगाटा, टोयामा, यामागाटा, फुकुई आणि ह्योगो या किनार्‍यांवर सुनामी  येण्याची चेतावणी जपानच्या हवामान विभागाने दिली आहे. यासह ‘जनतेने किनारी भाग सोडून इमारतीच्या वरच्या भागावर किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा’, असे आवाहनही जपान सरकारकडून करण्यात आले आहे.

जपानमध्ये मार्च २०११ मध्ये अत्यंत विनाशकारी भूकंप आला होता. त्यानंतर आलेल्या सुनामीत १६ सहस्र नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. त्या वेळी समुद्रात १० मीटर उंच लाटा उसळल्या होत्या.