Hindu Hater Congress : (म्हणे) ‘मनुवाद पुन्हा येत आहे !’ – उदित राज, काँग्रेसचे नेते
श्रीराममंदिराच्या उद्घाटनावरून काँग्रेसचे नेते उदित राज यांचे विद्वेषी विधान !
नवी देहली – काँग्रेसचे नेते उदित राज यांनी श्रीराममंदिराच्या उद्घाटनावरून आक्षेपार्ह विधान केले आहे. ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करतांना त्यांनी म्हटले आहे की, ‘श्रीराममंदिराचे उद्घाटन म्हणजे ५०० वर्षांनंतर मनुवाद पुन्हा येत आहे. भाजप केवळ दिखावा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणी राजा आहेत का ? भाजप राज्यघटना मानत नाही.’
सौजन्य : टाइम्स नाऊ
श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी ट्रस्टकडून ६ सहस्रांहून अधिक संत, महंत आणि मान्यवर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेत्या सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे; मात्र ते उपस्थित रहाणार आहेत कि नाही ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
'Manuvad is making a comeback after 500 years.' – Congress leader Udit Raj's yet another hateful statement, referring to the inauguration of Shri Ram Mandir
👉 Those who know about Manu and #Manusmriti, will never make such lame statements. Only the politicians who have… pic.twitter.com/y1QJ8EbBTe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 1, 2024
संपादकीय भूमिकामनु आणि त्याची मनुस्मृति काय आहे ?, हे खर्या अर्थाने ठाऊक असणारा असे विधान कदापि करणार नाही. केवळ हिंदु धर्माच्या द्वेषापोटीच हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्म स्वीकारणारे राजकारणी जाणीवपूर्वक अशा प्रकारची विधाने करून राजकारण करत आहेत, हे हिंदूंना ठाऊक आहे ! |