Ram Mandir Threat : जुबेर खान नावाच्या व्यक्तीकडून श्रीराममंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी !
पोलिसांकडून केले जात आहे अन्वेषण !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – जुबेर खान नावाच्या व्यक्तीकडून श्रीराममंदिर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विशेष कृती दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांना बाँबद्वारे उडवण्याची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला. भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा ई-मेल आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जुबेर खान याने तो पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी संबंधित आहे, असे म्हटले आहे. हा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला ?, याचा पोलीस शोध घेत आहेत.