Terriorists Arrested : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वर्ष २०२३ मध्ये अटक केले ६२५ आतंकवादी !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) वर्ष २०२३ मध्ये आतंकवादी कारवाया करणार्या १ सहस्र ४० ठिकाणी धाडी घातल्या आणि ६२५ जणांना अटक करून ५०० हून अधिक आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले. यावर्षात इस्लामिक स्टेटचे पुणे मॉड्युलही (यात आतंकवादी सामान्य माणसांप्रमाणे लोकांमध्ये वावरतात आणि गर्दीच्या ठिकाणी आक्रमणे, बाँबस्फोट करून पळून जातात) उघडकीस आणाले. याविषयीची माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक एन्.आय.ए.कडून प्रसारित करण्यात आली आहे. दुसरीकडे एन्.आय.ए.ने याच वर्षांत ७६ नक्षलवाद्यांनाही अटक केली, तर ५१३ आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले.
सौजन्य विऑन
१. वर्ष २०२३ मध्ये ५६ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्तही केली. विदेशातील भारतीय दूतावासांवरील आक्रमणाच्या प्रकरणीही ५० ठिकाणी धाडी घालून ८० लोकांची चौकशी केली. यात ४६ संशयितांची ओळखही पटवली.
२. एन्.आय.ए. आतंकवादी आणि कुख्यात गुंड यांच्या संबंधांच्या विरोधातही कारवाई करत २५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या आणि ५५ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले.
625 terrorists arrested by National Investigation Agency (NIA) in 2023 !
Without stopping at mere arrests, efforts should also be made to expedite punishment !
DETAILS :
New Delhi – The #NIA conducted 1,040 searches at terror launch pads, arrested 625 accused and charge… pic.twitter.com/UQPtBl8jd9— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 1, 2024
संपादकीय भूमिकाकेवळ अटक करून थांबू नये, तर अशांना जलद गतीने कठोर शिक्षा मिळण्यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे ! |