‘वेब सिरीज’मुळे भारतीय संस्कृती बिघडत आहे ! – धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर
‘वेब सिरीज’विरोधात कठोर कायदा करण्याची सरकारकडे मागणी
मुंबई – ‘वेब सिरीज’मुळे भारतीय संस्कृती बिघडत आहे. पवित्र नात्यांचा अनादर होत आहे. हे थांबवण्यासाठी भारत सरकारने कठोर कायदा करावा, अशी विनंती आहे, असे मार्गदर्शन धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर यांनी केले. बोरिवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘सनातन धर्माला कोरोना किंवा एच्आयव्ही (एड्स) झाला’, असे काही जण म्हणतात. आम्ही इतर कोणत्याही धर्माविषयी बोलत नसतांना तुम्ही आमच्या धर्माविषयी असे अपशब्द कसे बोलू शकता ?’, असेही ते या वेळी म्हणाले.
‘ज्या पद्धतीने आपण जानेवारी २०२४ च्या दृष्टीने राममंदिराची सिद्धता करत आहोत, तशीच सिद्धता येत्या जानेवारीत श्रीकृष्ण मंदिराचीही करा’, असे आवाहन त्यांनी केले.