वर्ष २०२३ मध्ये मुंबईत १ लाखांहून अधिक घरांची विक्री
मुंबई – वर्ष २०२३ मध्ये मुंबईत १ लाख २६ सहस्र ९०५ घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीच्या माध्यमातून राज्य सरकारला १० सहस्र ८६० कोटींचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीतून मिळाला आहे. कोरोना महामारीनंतर मोठ्या संख्येने ग्राहक हक्काच्या आणि मोठ्या घरांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे घरविक्रीत वाढ होत आहे. वर्ष २०१३ ते २०२० या काळात ६४ सहस्र ते ८० सहस्र घरविक्री झाली आहे. त्यामुळे ही घरविक्री विक्रमी ठरली आहे.