बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांनी घेतलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने पुनर्परीक्षा घेणार !
पुणे – बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांनी ‘फेलोशिप’साठी घेतलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याने ही परीक्षा रहित करून जानेवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या सेट विभागाच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पी.एच्.डी. करणार्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या ‘फेलोशिप’साठी परीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ या वर्षी झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रहित करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांच्या झालेल्या हानीचे दायित्व कुणाचे ? |