१०८ व्या ‘मन की बात’मध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पंतप्रधानांचा भर !
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमाच्या १०८ व्या भागात राष्ट्राला संबोधित केले. या वेळी त्यांनी ‘फिट इंडिया’ म्हणजे ‘स्वस्थ भारत’ मोहिमेवर भर दिला. यासाठी बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन् आनंद, अभिनेते अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हेही सहभागी झाले होते.
१. पंतप्रधानांनी १०८ व्या भागाचा आरंभ १०८ क्रमांकाचे महत्त्व नमूद करत म्हटले की, १०८ क्रमांकाचे पावित्र्य हा सखोल अभ्यासाचा विषय आहे. मंत्राचा जप १०८ वेळा केला जातो. मंदिरांना १०८ पायर्या असतात.
२. त्यांनी शेवटी श्रीरामाचे भजन सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, लोकांनी ‘श्रीराम भजन’ हॅशटॅगसह त्यांची निर्मिती प्रसारित करावी. त्यामुळे देशातील सर्व जनता सुखी होईल.
३. पंतप्रधान म्हणाले की, वर्ष २०१५ मध्ये भारत ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये (जागतिक नावीन्य क्रमवारीत) ८१ व्या क्रमांकावर होता. आज आपण ४० व्या क्रमांकावर आहोत. भारत एक ‘इनोव्हेशन हब’ बनणे हे या वस्तूस्थितीचे प्रतीक आहे.
४. आज शारीरिक आरोग्य आणि निरोगीपणा यांविषयी पुष्कळ चर्चा केली जाते; परंतु त्याच्याशी संबंधित हा मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे.