Genocide Kashmiri Hindus : ‘काश्मिरी हिंदू’ हे राजकीय लक्ष वेधण्याइतकी मोठी मतपेढी नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले ! – न्यायमूर्ती संजय किशन कौल (निवृत्त)
कलम ३७० रहित करणारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल (निवृत्त) यांचे वक्तव्य !
नवी देहली – जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी शक्तींमुळे विस्थापित झालेल्या साडेचार लाख काश्मिरी हिंदूंविषयी अत्यल्प चर्चा झाली. ‘काश्मिरी हिंदू’ हे राजकीय लक्ष वेधण्याइतकी मोठी मतपेढी नव्हते, असे वक्तव्य २५ डिसेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी केले. कलम ३७० रहित करण्याचा निकाल देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपिठात न्यायमूर्ती कौल यांचाही समावेश होता, तसेच ते स्वतः काश्मिरी हिंदूही आहेत.
(सौजन्य : टाइम्स नाऊ)
न्यायमूर्ती (निवृत्त) कौल पुढे म्हणाले की,
१. आतंकवादामुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता बिघडण्यापूर्वी विविध समुदायांचे लोक एकत्र रहात होते. खोर्यातील परिस्थिती एवढी कशी बिकट झाली ?, हे समजले नाही.
२. ३० वर्षांच्या बेलगाम हिंसाचारानंतर आता जनतेने पुढे जाण्याची वेळ आली आहे.
३. मुसलमानबहुल जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्य काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी सर्वांनी मौन बाळगल्यावरून मला खेद वाटतो.
४. १९९० च्या दशकात परिस्थिती इतकी बिघडली की, देशाची प्रादेशिक अखंडता धोक्यात आल्याने सैन्याला पाचारण करावे लागले. जम्मू-काश्मीरमधील लोकांची एक संपूर्ण पिढी आहे, ज्यांनी चांगला काळ पाहिलेला नाही.
संपादकीय भूमिकाआता असे पुन्हा होऊ नये, यासाठी समस्त हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. कुठेही हिंदूंवर ते ‘हिंदू’ असल्यामुळे अत्याचार झाले, तर सर्व हिंदूंनी त्याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे, हा काश्मीरची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग आहे ! |