Urban Naxalists : गोव्यात शहरी नक्षलवादी सक्रीय ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) : शहरी नक्षलवादी जात आणि धर्म यांच्या आधारावर देशात विभाजन करू पहात आहेत आणि अशांना दूर ठेवले पाहिजे. शहरी नक्षलवादी लोकांच्या डोक्यात नको ते विषय घालत आहेत. गोव्यातही काही प्रमाणात शहरी नक्षलवादी सक्रीय आहेत, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित भाजपच्या विविध मोर्चा (विभाग) प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा दावा केला.
ते पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीबकल्याण या विषयांवर काम करत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या लोकांना समवेत घेऊन राजकारण आणि समाजकारण केले पाहिजे.’’