Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’मधील ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांची संघटितपणे तक्रार !
पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) : वागातोर येथे चालू असलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी संघटितपणे हणजूण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रार करणार्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार महोत्सवात पहाटेपर्यंत संगीत वाजवले जात आहे; मात्र या विरोधात कोणतीच कारवाई होत नाही. ज्या भागात ‘सनबर्न’चे आयोजन केले जात आहे, तो रहिवासी भाग आहे. कुठल्याच यंत्रणेकडून याची नोंद घेतली जात नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘सनबर्न’मधील ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे.