नागपूर येथे हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘के.एफ्.सी.’ने हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली बंद !

  • ‘के.एफ्.सी.’च्या व्यवस्थापकांकडून क्षमायाचना !

  • ‘के.एफ्.सी.’च्या सर्व दुकानांत हलालप्रमाणित पदार्थांची विक्री होत असल्याचे उघड !  

‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?

पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरता मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते.

नागपूर, ३१ डिसेंबर (वार्ता.) – शहरातील माटे चौक येथे के.एफ्.सी. उपाहारगृहातून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली जात होती. याची माहिती राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याचा जाब ‘के.एफ्.सी.’ उपाहारगृहाच्या व्यवस्थापकांना विचारला. प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर मात्र व्यवस्थापकांनी हिंदूंची क्षमा मागून सर्व ग्राहकांचे पैसे परत केले. विशेष म्हणजे ‘के.एफ्.सी.’च्या उपाहारगृहातून महाराष्ट्रात सर्वत्र केवळ हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली जाते’, असे ‘के.एफ्.सी.’च्या ग्राहक सेवा केंद्राशी बोलतांना ध्वनीमुद्रित केलेली माहिती पांडे यांनी मिळवली. त्यानंतर २४ डिसेंबर या दिवशी वरील प्रकार घडला. (यातून इतर संघटनांंच्या पदाधिकार्‍यांनी आणि हिंदूंनी बोध घेऊन हलालप्रमाणित वस्तूंच्या विक्रीला विरोध केल्याने राष्ट्रद्रोह रोखला जाईल ! – संपादक)

१. ‘के.एफ्.सी.’च्या उपाहारगृहातून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री होत आहे’, अशी शंका पांडे यांना आली होती; मात्र प्रत्यक्ष पुरावा नसल्याने त्यांना ते सिद्ध करता येत नव्हते. त्यानंतर पांडे यांनी ‘के.एफ्.सी.’च्या ग्राहक सेवा केंद्राशी (‘कस्टमर केअर’शी) संवाद साधून त्याचे ध्वनीमुद्रण केले. त्यामध्ये ‘महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केले जाते’, असे संभाषण होतेे.

२. त्यानंतर पांडे यांनी ‘के.एफ्.सी.’ उपाहारगृहाच्या व्यवस्थापकासमोर हा पुरावा ठेवला.

३. त्या वेळी तिथे बरेच हिंदू उपस्थित होते. या वेळी सर्व हिंदूंंनी ‘हलालप्रमाणित पदार्थांची विक्री करून ‘के.एफ्.सी.’ने सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असे सांगून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री करण्यास विरोध केला, तसेच ‘पैसे परत करावे’, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी सर्व हिंदूंची क्षमा मागून ज्यांना हलालप्रमाणित पदार्थ दिले आहेत, अशा सर्व ग्राहकांना पैसे परत केले.

४. पांडे या वेळी म्हणाले, ‘‘नागपूर येथे परत अशाप्रकारे हलालप्रमाणित पदार्थ हिंदूंना दिल्यास किंवा इस्लामी शरीयत कायदा हिंदूंंवर थोपवण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण नागपूरवासी याचा विरोध करतील. आम्हा हिंदूंकडून हा हलालविरोधी लहानसा झटका आहे. पुढे असे प्रकार घडल्यास आंदोलन छेडले जाईल.’’

संपादकीय भूमिका 

  • गेल्या अनेक वर्षांपासून हलालप्रमाणित वस्तूंमधून जमा झालेला पैसा हा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. देशविरोधी कारवायांना पाठिंबा देणारे देशविरोधीच नव्हेत काय ?
  • ‘हलालप्रमाणित पदार्थां’ची विक्री बंद पाडणारे राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन ! अशी कृती सर्व शहरांतून केली गेली, तर हलालप्रमाणित पदार्थांची विक्री बंद होण्यास वेळ लागणार नाही !