पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना निमंत्रण !
श्रीराममंदिराचा लोकार्पण सोहळा
पुणे – अयोध्येमध्ये होणार्या श्रीराममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरता पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पाचंगे हे गेली ४० वर्षे चौघडा वादन करत आहेत. याविषयी रमेश पाचंगे म्हणाले, ‘‘श्रीराममंदिराचे खजिनदार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी माझी निवड केली आहे. त्यांनी माझे चौघडा वादन ऐकले आहे. त्यामुळे ते म्हणाले होते, ‘तुम्हाला अयोध्येला घेऊन जाणार.’ त्याप्रमाणे त्यांनी मला आमंत्रित केले आहे. मला पुष्कळ आनंद होत आहे.’’