रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
महाराष्ट्रातील धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
१. श्री. माणिक महादेवराव पवार, पेण
अ. आश्रमात आल्यावर प्रसन्न वाटते. ‘आश्रमात काहीतरी दैवी शक्ती वास करत आहे’, असे वाटले. ‘आश्रमाच्या स्वयंपाकघरात साक्षात् अन्नपूर्णादेवी वास करत आहे’, असे वाटते. ‘आश्रमातून परत जावे’, असे वाटत नाही.’
२. श्री. केतन हरिभाऊ शेंडे, खोपोली, जिल्हा रायगड
अ. ‘रामनाथी आश्रम पुष्कळ छान आहे.
आ. मला पुष्कळ दिवसांनी इतकी शांतता अनुभवता आली.’
३. श्री. सर्वेश साळुंके, पुणे
अ. ‘या वेळी आश्रमदर्शन करतांना ‘सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘साक्षात् श्री जगदंबादेवीची भेट झाली’, असे मला वाटले.’
४. श्री. सुरेश भाऊसाहेब यादव, जिल्हा कोल्हापूर
अ. ‘आश्रमात आल्यावर मनःशांती लाभली. मन आनंदी झाले. ‘मी देवलोकात आलो आहे’, असे जाणवले.’
५. श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी, जिल्हा कोल्हापूर
अ. ‘आश्रमात येताक्षणीच ‘प्रत्यक्ष स्वर्ग कसा असेल ?’, याची अनुभूती आली. आश्रमातील सर्व साधकांमध्ये चैतन्य आणि सात्त्विकता अनुभवता आली.’
६. श्री. रवींद्र पं. पाटील, नाशिक, महाराष्ट्र
अ. ‘आश्रम म्हणजे भगवंताचे निवासस्थान आहे’, असे मला वाटले. येथे माझ्या मनाला प्रसन्नता जाणवली आणि आनंद झाला.’
७. श्री. सौरभ शशिकांत कलाल, नंदुरबार
अ. ‘आश्रम पाहून मनाला आनंद झाला. ‘चांगल्या आणि अनिष्ट शक्ती कशा प्रकारे कार्यरत असतात’, ते कळले. आश्रमातील स्वच्छता आवडली. ‘सर्व साधिका मातृरूपात आहेत आणि पुरुष साधक वडिलांच्या रूपात आहेत’, असे मला वाटले.’
८. श्री. चुडामण बोरसे, धुळे
अ. ‘मी आजपर्यंत असा आश्रम बघितला नाही. आश्रमात आल्यावर ‘मी स्वर्गात आलो आहे’, असे मला वाटत होते. खूप छान !’
९. श्री. अरुण सीताराम महाजन, मुखेद, बाराठाळी, जिल्हा नांदेड.
अ. ‘प्रत्येक वेळी आश्रम पहातांना मला काहीतरी वेगळे जाणवते. या वेळी माझे मन आपोआप शांत होऊन निर्विचार झाले.’
मध्यप्रदेशमधील धर्मप्रेमीने दिलेला अभिप्राय
१ . श्री. कृष्णा सिंह सोलंकी, करोंद, भोपाल
अ. ‘आश्रम पुष्कळ अद्भुत आहे. येथे फारच स्वच्छता आहे आणि हा आश्रम सनातनी लोकांची एक शक्ती आहे. आमच्या आसपासच्या आश्रमांना आपण अशा प्रकारे बनवू शकतो.’
आसाम येथील धर्मप्रेमीने दिलेला अभिप्राय
१. श्री. बिश्व ज्योति नाथ (सैनिक, महाकाल सेना) होजाई
अ. मी प्रत्येक वेळी आश्रमात येतो, त्या वेळी मला अधिकाधिक आध्यात्मिक अनुभूती येत असल्याची जाणीव होते. मी नामजप करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ‘अनुभूती येत असाव्यात’, असे मला वाटते.’
केरळ येथील धर्मप्रेमीने दिलेला अभिप्राय
१. श्री. पी.टी. राजू, केरळ
अ. प्रत्येक वेळी आश्रम पहाणे अधिकाधिक प्रेरणादायी आणि ज्ञानदायी असणे : ‘मी ७ वेळा आश्रम पाहिला आहे. प्रत्येक वेळी आश्रम पहाणे अधिकाधिक प्रेरणादायी आणि ज्ञानदायी असते. प्रत्येक वेळी नवीन विषय असतो. साधनेमुळे मनाचा विकास होतो. मनाच्या विकासामुळे आध्यात्मिक उन्नती होते. ‘हा विकास किती झाला ?’, याचे निरीक्षण मी करू शकलो.’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक १६.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |