ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र आघाडीत अडकलेले छत्तीसगडमधील हिंदू सुशासनाच्या प्रतीक्षेत !
ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र आघाडीत अडकलेल्या छत्तीसगडसह भारताला मुक्त करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्रच हवे !
देशातील नक्षलवादी चळवळ छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. येथे ख्रिस्ती मिशनरीही मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या कारवाया करत आहेत. यात आता मुसलमानांच्या कारवायांची भर पडली आहे. ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र युतीत येथील हिंदु अडकला आहे.
– श्री. सुनील घनवट
छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप अनपेक्षितरित्या सत्तेवर आला आहे. तेथे भाजपला ५४, तर काँग्रेसला ३५ जागा जिंकता आल्या आहेत. छत्तीसगडमधील जनतेने काँग्रेसच्या कारभाराविषयीचा रोष मतपेटीतून दाखवला आहे. हिंदूबहुल असूनही छत्तीसगडमध्ये हिंदूंची स्थिती भीषण आहे. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांची समस्या सर्वांना माहिती आहे; परंतु तेथील आदिवासींचे धर्मांतर, त्यांना हिंदु धर्मापासून तोडण्याचा डाव, गोतस्करी या समस्यांनीही तेथील हिंदुत्व घेरलेले आहे. काँग्रेसच्या काळात या सगळ्याला खतपाणीच घातले गेले. थोडक्यात सांगायचे, तर आता विद्यमान सरकारला छत्तीसगडमध्ये ९३.२५ टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदु समाजासाठी करण्यासारखे पुष्कळ काही आहे.
१. ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे अवैध धर्मांतर
१ अ. जागोजागी चर्चची उभारणी : काँग्रेसचे नेते अजित जोगी यांच्या कार्यकाळात छत्तीसगड राज्यात ख्रिस्ती धर्मांतराला सोन्याचे दिवस आले. जागोजागी चर्च उभारले गेले. पुढे भाजपचे रमण सिंह यांच्या सरकारच्या काळातही हे प्रकार थांबवले गेले नाहीत. आशिया खंडातील दुसरे मोठे चर्च छत्तीसगडमध्ये आहे. एका वेळी १० सहस्र लोक प्रार्थना करू शकतील, एवढे मोठे चर्च जशपूर जिल्ह्यातील कुनकुरी येथे आहे. छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांतील ख्रिस्ती मिशनर्यांचे हे केंद्र झाले आहे. तेथील अनेक ख्रिस्ती या चर्चमध्ये प्रार्थना करायला येतात.
१ आ. सरकारी अधिकार्यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट : हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. छत्तीसगडमध्ये आदिवासी समाज लक्षणीय आहे. तेथील आदिवासी, अविकसित हिंदूंना आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक अशा सुविधांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत. एवढ्यावरच न थांबता चतुर्थ श्रेणी सरकारी अधिकार्यांना पदोन्नतीचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. सरकारी अधिकार्यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्यांचा सुळसुळाट झाला आहे.
२. आदिवासींमध्ये राष्ट्रविरोधी संघटनांच्या कारवायांचा जोर
आदिवासी भागांत ‘बामसेफ’सारख्या राष्ट्रविरोधी संघटनांच्या कारवायांनी जोर पकडला आहे. तेथील आदिवासींमध्ये हिंदुविरोधी भावना रुजवली जात आहे. त्यामुळे आदिवासी भागांत ‘आदिवासी हूं, हिंदू नही हूं’ (मी आदिवासी आहे, हिंदु नाही), अशी भावना वाढत आहे. तेथील अनेक आदिवासींनी देवतांच्या मूर्ती विसर्जित केल्या आहेत. ते आता त्यांच्या घरात बायबल ठेवतात. आदिवासींनी मंदिरांनाही टाळे ठोकलेले आहे. यामागेही ख्रिस्ती आणि हिंदुविरोधी संघटनाच आहेत.
३. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आणि हिंदु संतांचा छळ
रमण सिंह सरकारच्या काळात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमध्येही वाढ झाली होती. सरकारने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते. एकीकडे ख्रिस्ती मिशनर्यांना मोकळे रान सोडलेले असतांना हिंदु संतांच्या आश्रमांना मात्र लक्ष्य केले जात आहे. गोरक्षणाचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे चामडी पाटेश्वर धामचे प.पू. बालकदासजी महाराज यांच्या आश्रमाच्या भूमीवरून महाराजांना काँग्रेसच्या काळात पुष्कळ त्रास सहन करावा लागला. वर्ष २०२१ मध्ये रायपूर येथे संत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सहभागी झालेले कालीचरण महाराज यांना रायपूर पोलिसांनी एका विधानासाठी अटक केली. साधू संतांच्या या अवमानामुळे अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना काँग्रेस सरकारवर अप्रसन्न झाल्या. त्याचे दुष्परिणाम पुढे सरकारला भोगावे लागले.
४. वाढती व्यसनाधीनता
छत्तीसगडला ‘धान का कटोरा’ (धान्य असलेले भांडे) म्हटले जाते. येथे सरकारने स्वस्त धान्यापासून आरोग्य सुविधांपर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातून लोकांना अनेक जीवनावश्यक वस्तू फुकट वाटल्या जात आहेत. त्यामुळे लोकांना खाण्या-पिण्यासाठी कष्ट केलेच पाहिजेत, अशी स्थिती राहिलेली नाही. परिणामी लोकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
५. भूमी बळकावण्यासाठी हिंदु मुलींची फसवणूक
कायद्यानुसार आदिवासींच्या जागा अन्य कुणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे जंगलातील त्यांच्या मोक्याच्या जागा बळकावण्यासाठी धर्मांध आदिवासी मुलींशी लग्न करतात अन् त्यांच्या जागा कह्यात घेतल्या जात आहेत.
६. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण
काँग्रेसचे मंत्री महंमद अकबर यांच्या कार्यकाळात वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. त्यांच्याच कार्यकाळात रायपूरमध्ये विमानतळाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे.
७. गोतस्करी आणि गोवंश हत्या
छत्तीसगडमध्ये गोवंश हत्यांचे प्रमाण पुष्कळच आहे. येथून महाराष्ट्रातील नागपूर आणि कर्नाटक राज्य येथे गोतस्करी केली जाते. छत्तीसगड सरकारने मध्यंतरी गोमय (गायीचे शेण) विकत घेण्याची एक योजना आणली होती. त्यासह ‘गोठाण योजना’ काँग्रेस सरकारने आणली होती. ‘गोवंशाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट देणार आहे’, असे सरकारने सांगितले होते. प्रत्यक्षात हे पुतना मावशीचे प्रेम आहे; कारण गोवंश हत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी हेच सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नाही.
गोरक्षण करतांना गोतस्कर अनेक गोरक्षकांवर आक्रमणे करतात. सरकार या आक्रमणांच्या प्रकरणीही कोणतीही कारवाई करत नाही. उलट गोरक्षक करत असलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करते. येथील स्थानिक भाषेत ‘छत्तीसगढीया, सबसे बढिया’ असे म्हटले जाते. याचा अर्थ छत्तीसगड हे सर्वांत चांगले आहे. या म्हणीप्रमाणे छत्तीसगड राज्य होण्यासाठी आता भाजप सरकारने प्रयत्न करावेत, हीच हिंदूंची अपेक्षा !
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (१७.१२.२०२३)